अक्षर मानव संघटनेच्या राज्य कार्यवाहपदी ‘आझाद खान’ यांची निवड

अमरावती:- अक्षर मानव संघटना ही साहित्य, समाज, कला, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्योग, श्रम व विज्ञान या विषयांच्या अनुषंगाने विविध संमेलने, शिबिर, कार्यशाळा, गप्पा, संवाद सहवास अशा प्रकारचे उपक्रम महाराष्ट्रभर विविध भागात राबवते. अश्या अनेक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या संघटनेच्या राज्य कार्यवाहपदी तिवस्याचे श्री आझाद खान यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, लेखक,कथा- कादंबरीकार राजन खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत आझाद खान यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
मागिल 25 वर्षा पासून अक्षर मानव मार्फत सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन कुटुंब आणि समाजव्यवस्थेचे प्रश्न सोडवुन मानवी भल्याच काम करणारी ही संघटना आहे. अशी माहिती आझाद खान यांनी देवुन नव्या जबाबदारी बद्दल आभार व्यक्त केले. सर्वांच्या मदतीने माणुसकीच्या मुल्यावर आधारित समाजरचनेची स्वप्न उराशी बाळगून सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन या चळवळीचे काम महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी काम मी करणार आहे. अशी ग्वाही आझाद यांनी दिली.
ते आझाद फायनान्स कंपनीचे संचालक असुन 15 वर्षा पासून ते सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात काम करतात. आजपर्यंत अनेक बेरोजगार युवकांना तसेच कुटुंबांना त्यांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले आहे. अक्षर मानव संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत डांगे व भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष अजिंक्य किन्हिकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देवून महाराष्ट्रभर अक्षर मानव संघटनेला ते अधिक बळकटी मिळवून देतिल असा विश्वास व्यक्त केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र भरातुन त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच समाजाच्या सर्व स्तरामधुन आझाद खान यांच विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे.