महत्वाचे

जिंती येथील अल्पवयीन मुलांचे अपहरण करणाऱ्या चौघांना केली अटक एक जण फरार

जिंती ता फलटण येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयतांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. अपहरणानंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अपहृत मुलाची सुखरूप सुटका झाली होती

याबाबत लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश उर्फ मोन्या रमेश निंभोरे (वय 29), आशुतोष उर्फ बंट्या संतोष जाधव (वय 21), प्रवीण किसन मोहिते (वय 27) आणि सिद्धांत यशवंत बनसोडे (वय 19) या चौघा संशयतांना पोलिसांनी अटक केली असून अजय शशिकांत सपकाळ हा फरार आहे संशयितांनी जिंती गावातील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केली होती घटनेनंतर लोणंद पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून चौघांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत अपहृत मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.