
खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर गावाजवळील पांढरी नावच्या शिवारात, २९ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ओढ्याला पूर आल्यामुळे महिला पाण्यात वाहून गेली. मयत महिलेचे नाव सुजाता उल्हास काशीद, वय ५४ वर्षे, पत्ता रा. शिवाजीनगर, ता. खंडाळा, जि. सातारा.
शिवाजीनगर गावाच्या हद्दीत पांढरी नावच्या शिवारात, गावातील सरपण आणण्यासाठी सुजाता काशीद आणि कलूबाई मोरे या दोघेजण महिला गेल्या होत्या. या वेळी सुजाता ओढा ओलांडत असताना तिचा पाय घसरला, व त्यावेळी ओढ्यात पाणी भरपूर होते. पाण्याच्या वेगामुळे सुजाता पुढे वाहून गेल्या.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर, फिर्यादी चंद्रसेन रामचंद्र पवार व इतर गावकऱ्यांनी सुजाताला पाण्यातून बाहेर काढले आणि तिला खंडाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून सुजाता मयत झाल्याची घोषणा केली. ओड्याला पाणी भरपूर असल्यामुळे त्यांच्या नाका तोंडात पाणी जाऊन त्या बुडाल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले
घटनेबाबत खंडाळा पोलीस ठाण्यात अंतर्गत बी.एन.एस.एस. प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.