अंजनगांव सुर्जी येथे कृषी सेवा केंद्र संचालक व कृषी अधिकारी याची खरिप आढावा बैठक संपन्न
शेतकऱ्यांनी डीएपी ला पर्यायी खते वापरावी : तोडकर कृषी विकास अधिकारी अमरावती

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी पंचायत समिती हॉल येथे खरिप आढावा बैठक संपन्न झाली या अढावा बैठक मध्ये कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अमरावती श्री मल्ला तोडकर तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर प्रफुल सातव,नरेंद्र वसुकर तालुका कृषी अधिकारी अंजनगांव व जय भिम मॅडम ( बिडिओ) अजनगांव व पंचायत समिती अंजनगांव कृषी अधिकारी अश्विन राठोड, पंकज मोदी शहर अध्यक्ष रोहीत ॲग्रो एजन्सीज चे संचालक व अ भा ग्रा पत्रकार संघटना जिल्हा अध्यक्ष सुधाकर टिपरे हे प्रामुख्याने उपस्थित होते दुपारी 2 वाजता आढावा बैठक संपन्न झाली बैठकिला अंजनगांव तालुक्या मधिल सर्व कृषी सेवा केंद्र संचालक उपस्थित होते यावर्षी बियाणे विक्री हि साथी ॲपमधुन विक्री करावी त्याचे ट्रेनिंग सुद्धा ऑनलाईन देण्यात आले कोणतेही बियाणे हे एम आर पि च्या वर विकु नये रासायनिक खते हे चांगल्या कंपनीचे विकावे कोणत्याही दुकानदाराने रामन्डअप बि टि विकु नये जो हि बि टि विकेल तो आणि जो हि बि टि विकत घेईल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे कृषी विकास अधिकारी अमरावती तोडकर म्हणाले. होते तसेच शेतकऱ्यांना एकाच बियाण्याचा तसेच रासा खताचा आग्रह करू नये D AP सारखे खत शेतकरी स्वतः घरी तयार करू शकतो अर्धा पोत युरिया आणि तिन पोते सिंगल सुपर फॉस्फेट हे मिक्स करूण घ्यावे त्यापासून DAP तयार होते तसेच आपल्या शेतामध्ये माती परिक्षण करूनच खताचे नियोजन करावे २०x२०x० x13 तसेच 1 5/15/15/ 10/26/26 पोर्टॅश युक्त खत वापरावे असे शेतकऱ्यांना कृषी विकास अधिकारी अमरावती श्री तोडकर यांनी सांगितले तसेच श्री राठोड यांनी सुद्धा दुकाणदारांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले या बैठकिला 50 ते 60 कृषी सेवा केंद्र संचालक हजर होते जे दुकाणदार गैरहजर होते त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात येईल असे कृषी विकास अधिकारी श्री तोडकर यांनी आवर्जुन सांगितले ‘ या बैठकिला पत्रकार संघटना जिल्हा अध्यक्ष तसेच रोहीत ॲग्रो एजन्सीज चे संचालक यांनी सुध्दा महत्वाचे मार्गदशन केले श्री सातव यांनी सुद्धा मोलाचे मार्गदशन केले तसेच श्री नरेंद्र वसुकर तालुका कृषी अधिकारी यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले (बि डि ओ ) भिम मॅडम यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री राऊत यांनी केले.