कृषीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

देऊळ्गाव धान घोटाळा; ५ संचालकांना अटक

गडचिरोली  :-  कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील ३ कोटी ९५ लाख रुपयांच्या धान खरेदी घोटाळ्याने गडचिरोलीत खळबळ माजवली आहे. या प्रकरणात कुरखेडा पोलिसांनी काल, १० मे रोजी संस्थेचे अध्यक्ष पतिराम कोकोडे, उपाध्यक्ष पंढरी दादगाये, संचालक मंडळाचे सदस्य भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे आणि भीमराव शेंडे या पाच संचालकांना अटक केली. या सर्वांना आज, ११ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. मात्र, या घोटाळ्याचे मुख्य आरोपी सहायक प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र मेश्राम अद्याप फरार असून, पोलिसांचा शोध सुरू आहे.

पाच दिवसांची पोलीस कोठडी, मुख्य आरोपी बावणे – मेश्राम फरारच

या घोटाळ्यात २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीत १०,००० क्विटल धान आणि ३४,६०१ बारदाना गायब झाल्याचे उघड झाले. १९ एप्रिल रोजी बावणे, विपणन अधिकारी सी.डी. कासारकर, एच. व्ही. पेंदाम  आणि इतर १७ जणांवर कुरखेडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा (Fraud) गुन्हा नोंदवण्यात आला. तपासात, मेश्राम यांनी निरक्षर शेतकर्‍यांचे ७/१२ उतारे ऑनलाइन वापरून बनावट बिले तयार केली आणि धान विक्रीचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करून सादर रक्कम मेश्राम यांच्या खात्यात वळते झाले. यामुळे शेतकर्‍यांवरही चौकशीचा बडगा उगारला गेला आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये संताप आहे.
यापूर्वी दोन विपणन अधिकार्‍यांना अटक झाली असून, त्यांना २३ एप्रिल रोजी न्यायालयाने चंद्रपूर कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावली. बावणे आणि मेश्राम यांनी गडचिरोली सत्र न्यायालयात  अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, परंतु पोलिसांनी हरकत घेतल्याने निर्णय प्रलंबित आहे. २१ एप्रिल रोजी बावणे यांना निलंबित करून त्यांचे मुख्यालय नंदूरबार येथे निश्चित करण्यात आले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.