ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

“भीमनगरच्या रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन न्याय द्यावा”, मेधा पाटकर यांची मागणी

मेधा पाटकर यांनी आज भीमनगरला भेट देऊन भीमनगरवासीयांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पुणे : भीमनगर वाचविण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार, समाजसेविका मेधा पाटकर यांनी भीमनगरला भेट देऊन भीमनगरवासीयांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या. तसंच न्यायासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाटकर यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी देविदास ओहाळ यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

समाजसेविका मेधा पाटकर काय म्हणाल्या? : “झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील, घरे खाली करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं दिलेली नोटीस मागे घ्यावी. भीमनगरवासीयांना आहे, त्याच ठिकाणी घरे देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणी जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे.

भीमनगरवासीयांची फसवणूक : “भीमनगरच्या पुनर्वसनासाठी भक्ती इंटरप्राईजेस संस्थेनं भीमनगरवासीयांना मोठमोठी आश्वासनं दिली. त्याच जागेवर चांगली घरे देण्याचं मान्य केलं. प्रत्यक्षात नियमाप्रमाणे वस्तीतील 70 टक्के कुटुंबांची सहमती मिळण्यापूर्वीच 50 कुटुंबांना वारजे येथे पाठवण्यात आले. त्यापैकी पंधरा कुटुंब भीमनगरमध्ये परत आले. या कुटुंबांना ज्या ठिकाणी पाठवण्यात आलं, ती इमारत सदर विकासकानं नव्हे तर महापालिकेनं बांधल्यामुळं उर्वरित 35 कुटुंबांना जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली. एक प्रकारे ही भीमनगरवासीयांची फसवणूकच आहे,” अशी टीका पाटकर यांनी केली.

शेकडो कोटींचा टीडीआर घोटाळा : “झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये सर्वात मोठा घोटाळा हा विकास हक्क हस्तांतरणात केला जातो. विकास मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन गरिबांना दूर कुठंतरी नेऊन टाकतात. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घर मिळवण्यासाठी पात्र, अपात्र ठरवताना काही अपात्रांना पात्र तर पात्रांना अपात्र ठरवलं जातं,” याकडं पाटकर यांनी लक्ष वेधलं. त्यावर, काही राजकीय नेते आणि महापालिका अधिकारी यांच्याशी संगणमत करून विकासकाने घरे न बांधताच शेकडो कोटींचा टीडीआर घोटाळा केल्याचं भीमनगरच्या रहिवाशांनी पाटकर यांच्या निदर्शनास आणून दिलं.
न्याय मिळवण्यासाठी आंदोलन : भीमनगरच्या आंदोलक आणि रहिवाशांना आपला पाठिंबा जाहीर करून पाटकर म्हणाल्या की, “भीमनगरमधील रहिवाशांपैकी 90 टक्के रहिवासी अल्पसंख्याक आणि कष्टकरी आहेत. ते संविधानाला अनुसरून न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे महापालिका, तक्रार निवारण प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाचा नगरविकास विभागाकडून त्यांना न्याय मिळावा”.
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.