
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील फलटण तालुक्यातील सालपे गावात दिनांक 30 जून 2025 रोजी एक दुर्दैवी घटना घडली. विहिरीत पडून आई व सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती लोणंद पोलिसांनी दिली आहे.
ही घटना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मौजे सालपे गावच्या हद्दीतील कोळेकर वस्ती शेजारी असलेल्या पंधरकी नावाच्या शिवारात घडली. या घटनेत सौ. माधुरी लक्ष्मण कचरे (वय 28 वर्षे) व त्यांचा मुलगा शंभुराज लक्ष्मण कचरे (वय 7 वर्षे) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती माधुरी कचरे यांचे नातेवाईक दादा यशवंत कचरे (वय 37, व्यवसाय शेळी-बकरी पालन, रा. सालपे) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली.
घटनेचा प्राथमिक तपास पोलीस नाईक मदने (ब.नं. 1151, करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अकस्मात मृत्यूची असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास सुरु आहे.