महत्वाचे

प्राणघातक अपघात करुन पळुन गेलेले वाहन चालक आरोपीस १२ तासाचे आत लोणंद पोलीसांनी केले जेरबंद..

लोणंद प्रतिनिधी निखिल राऊत

दिनांक १८/०६/२०२५ रोजी फिर्यादी सिध्दिकी रियाज बागवान रा. रविवार पेठ, फलटण यांनी समक्ष लोणंद पोलीस ठाणेत येवुन तक्रार दिली की, त्यांचे चुलते असिफ जहांगिर बागवान वय ४६ वर्षे रा. उमाजी नाईक चौक, फलटण यांना दिनांक १७/०६/२०२५ रोजीचे रात्री ११.४५ वा. शिरवळ चौक, लोणंद या ठिकाणी एका अज्ञात वाहनावरील चालकाने वाहन हयगयीने, अविचाराने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपने वाहन चालवुन धडक देवुन अपघातात त्यांचे डोकीस व उजवे पायास गंभीर तसेच किरकोळ जखमा होवुन त्यांचे मयतास कारणीभुत झाला व तेथुन पळुन गेला अशी फिर्याद दिलेने लोणंद पोलीस ठाणेत गुन्हा रजि.क्र. २३८/२०२५ बी.एन.एस. कलम २८१,१०६ (१) सह मोवाका कलम १३४ (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांर्भीर्य लक्षत घेऊन मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री. तुषार दोशी सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो, सातारा वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सुशिल भोसले सहा. पोलीस निरिक्षक व त्यांचे पथकाने सदर गुन्हयातील अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यास सुरवात केली असता पोलीसांनी गोपनीय माहीती काढुन सदर अपघात करुन पळुन गेले वाहन हे मारुती सुझुकी कंपनीचे ईको गाडी क्र. मारुती सुझुकी ईको क्र MH 11 CW 9892 आहे व त्यावरील चालक हा यशवंत कृष्णा माने वय २७ वर्षे रा. मातंगवस्ती, लोणंद ता. खंडाळा जि. सातारा हा असलेची खात्री केली व तात्काळ पोलीस पथकाने यातील आरोपी व गुन्हयातील वाहन ताब्यात घेतले असुन यातील आरोपीनें गुन्हा केलेचे कबुल केले आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक साो सातारा तुषार दोशी सो, मा.अप्पर पोलीस अधीक्षक साो. वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे श्री.सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोहवा संतोष नाळे, पो.ना बापुराव मदने, पो.कॉ. अंकुश कोळेकर, गोविदं आंधळे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन पोलीस हवालदार संतोष नाळे हे पुढील तपास करीत आहेत. मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी विषेश अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.