ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अचलपूरला अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयासह

* धारणी तालुक्यात सुसर्दा व हरीसाल ला पोलिस स्टेशन

* चिखलदरा तालुक्यात टेम्बुसोंडा व काटकुंभपोलिस स्टेशन

* चांदुरबाजारला एसडीपीओ कार्यालय

 

 

परतवाडा प्रतिनीधी  शंतनू इंगळे

परतावाडा: अमरावती ग्रामीण विभागातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार नवीन पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्थापन करण्यासाठीची हालचाल सुरू झाली आहे. सद्यस्थितीत अमरावती ग्रामीण घटकात एकूण ३१ पोलीस ठाणे, २ सायबर पोलीस स्टेशन, ६ पोलीस चौक्या आणि ११ आऊट पोस्ट कार्यरत आहेत.

ग्रामिण भागात वाढत असलेली लोकसंख्या व भौगोलिक विस्तार पाहता पोलिस स्टेशनची गरज प्रामुख्याने जाणवत आहे. परतवाडा शहर व ग्रामिणचे कामकाज एकाच पोलिस स्टेशनच्या माध्यमातून चालविल्या जाते. परतवाडा शहर व ग्रामिण असे दोन पोलिस स्टेशन निर्माण व्हावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासुन केल्या जात आहे. ग्रामिण पोलिसांच्या वतीने अचलपूर – परतवाडा येथे नवीन अपर पोलीस अधीक्षक कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चांदूर बाजार येथे निर्मितीचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. सध्या कार्यरत असलेल्या परतवाडा पोलीस स्टेशनचे विभाजन करून परतवाडा ग्रामीण (नवीन प्रस्तावित), धारणी पोलीस स्टेशनचे विभाजन करून सुसर्दा हरिसाल आणि चिखलदरा पोलीस स्टेशनचे विभाजन करून टेम्बुसोंडा व काटकुंभअसे एकूण पाच नविन पोलीस स्टेशनची निर्मिती व आवश्यक साधनसामग्री आणि मनुष्यबळाची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे. अमरावती ग्रामिण भागात हद्दीतील पो.स्टे. शिरखेड मधील नेरपिंगळाई, दुरक्षेत्र, शिरजगाव कसबा करजगाव दुरक्षेत्र, पोस्टे वरूड- राजुरा बाजार पोस्टे शेंदुरजना घाट – पुसला दुरक्षेत्र, पोस्टे मोर्शी -हिवरखेड या पाचही ठिकाणी नविन पोलीस दुरक्षेत्र निर्मितीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आले असून, कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही पाऊले महत्त्वाची मानली जात आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.