लग्नाच्या पंगतीत पनीर हेच बनले ‘स्टेटस सिम्बॉल’
महागाई वाढली, वांगी-बटाटे गायब; पनीर नसेल तर वाटतो कमीपणा

धामणगाव रेल्वे : अलीकडच्या काळात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळी हात आखडता घेतला जात आहे. दुसरीकडे मात्र लग्नाच्या पंगतीतून वांगी-बटाटे गायब होत असून, त्याजागी पनीर हेच “स्टेटस सिम्बॉल” बनले आहे.
सध्या लग्नसराई धूमधडाक्यात सुरू असून, खाद्यपदार्थात वेगवेगळे मेन्यू ठेवण्यात येत आहेत. पूर्वी लग्नसमारंभात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये वांगे-बटाट्याची भाजी हमखास राहायची; परंतु आता ते मागे पडले असून, पनीरच्या भाजीवर भर दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पूर्वी शहरी भागात वेगवेगळे मेन्यू करण्यात येत. परंतु, अलीकडच्या काळात ग्रामीण भागातही पनीर हेच स्टेट्स सिम्बॉल बनत चालले आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी वांगी-बटाट्याची भाजी हा मेन्यू पंगतीतून हद्दपार झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातही आता विविध प्रकारचे मेन्यू वन्हाड्यांसाठी दिले जात आहेत.
७० टक्के लग्न पंगतीत लग्न पंगतीत पनीरची भाजी करण्यावर भर दिला जात आहे. काही ठिकाणी तर वराकडील मंडळींकडूनही लग्नसमारंभात मेनू कोणते असावेत, हेही आधीच ठरविले जात आहे.
फॅन्सी, आकर्षक खाद्यपदार्थांकडे कल लग्नसमारंभात पनीरसह फॅन्सी, आकर्षक खाद्यपदार्थांकडेही भर दिला जात आहे. यामुळे वन्हाडी मंडळी खुश होत आहेत. खाद्यपदार्थात विविध मेन्यू ठेवण्याची परंपरा सुरू झाली आहे.
लग्नात कॅटरिंगवर लाखांनी करण्यात येतोय खर्च लग्न समारंभात बहुतांश आयोजक मंडळींकडून कॅटरिंगवर भर दिला जातो. त्यासाठी लाखांनी खर्च होतो, शिवाय साहित्याच्या किमतीतही वाढ झाल्याने खर्च वाढला आहे.