ताज्या घडामोडीदेश विदेशफॅशनमहत्वाचे

अचलपूर तालुक्यात अवैध दारूविक्री, एसडीओंकडे तक्रार

उत्पादन शुल्क विभाग करतो तरी काय? धाब्यांवर सर्रास विक्री

 

परतवाडा : परतवाडा, अचलपूर शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. शहरालगतच्या रस्त्यांवर ढाब्यांवरसुद्धा विक्री होत असल्याची तक्रार अचलपूर उपविभागीय अधिकारी यांना उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

दुसरीकडे सतत कुलूपबंद राहणारे उत्पादन शुल्क विभाग नावालाच असल्याचे चित्र संताप व्यक्त करणारे आहे. अचलपूर तालुक्यासह जुळ्या शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना दा़रूविक्री केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी अवैध दारूविक्रीचे अड्डे बनले आहेत. प्रामुख्याने अनेक रेस्टॉरंट, धाबे सर्रास विक्री करतात. येथील अवैध विक्री तत्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलनाचा

इशारा अचलपूर उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांना उद्धवसेनेचे पदाधिकारी अभिजीत काळमेघ, मनीष शर्मा, गजानन फिस्के, सुधीर देशमुख, नीलेश पोटे, राजा पिंजरकर, सागर वाटाणे, मुरली पडोळे आदींनी दिला.

शहरात नियमांची होतेय पायमल्ली शहरातील परवानाधारक बिअर बार, परमिट रूम, बिअर शॉपी येथे शासन नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बिअर बार, परमिट रूममध्ये ग्राहक परवाना नसतानाही ग्राहकांना दारूविक्री केली जात आहे. बिअर शॉपीमध्ये फक्त विक्री परवाना असतानाही ग्राहकांना बसवून दारू, बिअर पाजली जात आहे.

उत्पादन शुल्क विभाग गप्प 6जुळ्या शहरात पाच तालुक्यांसाठी असलेला दारू उत्पादन शुल्क विभाग मात्र गप्प आहे. कुठल्याच प्रकारची कारवाई केल्याचे पुढे आले नाही. त्यामुळे अधिकारी हप्ताखोरीत मग्न असल्याची चर्चा असून, कार्यालय नावालाच उरले असल्याची संतप्त प्रतिक्रिया आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.