कृषीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

उन्हामुळे आंबिया बहराच्या संत्र्याला गळती

वरूड : तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने आंबिया बहराच्या संत्रा फळाला गळती लागली. यावर्षी आंबिया बहराचे उत्पादन कमी असताना ४२ ते ४३ अंश सेल्सियसवर गेलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यासह संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

विदर्भाच्या कॅलिफोर्नियावर अतितापमानाचे संकट ओढवले आहे. मोठ्या कष्टातून तयार होत असलेली आंबिया बहाराची बोराच्या आकाराची संत्री गळून पडत आहे. वरूड तालुक्याची आर्थिक मदार संत्रा पिकावर अवलंबून असते. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या या पिकाची लागवड तालुक्यात २५ हजार हेक्टर जमिनीवर आहे. गतवर्षी गारपीट आणि अतिवृष्टीमुळे आंबिया बहरासह मृग बहराला गळती लागल्याने फटका बसला होता. यंदा अतितापमानाचा फटका बसत आहे.

अतितापमानामुळे संत्रा फळगळ होत असली तरी कृषी विभागाने याकडे अद्याप लक्षच दिलेले नाही. यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत, अशी व्यथा अतुल काळे (रा. शेंदूरजनघाट) यांनी मांडली.

 

अचलपुरात रस्त्यावर शुकशुकाट, पारा ४२.५ अचलपूर : यंदाच्या उन्हाळ्यात ८ एप्रिल रोजी सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सियस तापमानची नोंद अचलपुरात करण्यात आली. मागील काही दिवस ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस असल्यामुळे तापमान ३५ अंशाच्या खाली आले होते. परंतु, अचानक तापमानाने उसळी घेतली. यामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. शीतपेय, लिंबूपाणी उसाचा रस यामध्ये विक्रीत वाढ झाली आहे. कूलर विक्रीमध्येसुद्धा वाढ झाली असून विजेची मागणी वाढली आहे.

 

पुन्हा बोअरचे सत्र ?उत्पादन कमी असताना फळगळती सुरू असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच भूजल पातळी खालावल्याने जलसंकट निर्माण होऊन संत्र्याचे ओलित करणे कठीण झाले. विहिरी कोरड्या पडायला लागल्याने नाइलाजाने संत्रा जगविण्याकरिता पुन्हा बोअर करायला तालुक्यात सुरुवात झाली आहे. ओलिताचा प्रश्न ऐरणीवर असताना रात्रीचा वीजपुरवठासुद्धा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.