ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
अमरावतीत पहाटेच दाखल होतात चक्क नंबर प्लेटवर खोडतोड असलेले ट्रक !
https://www.youtube.com/@riteshkadu5496

अमरावती : रेतीघाटांचे लिलाव झाले तरी अनेक घाटांवरून विनारॉयल्टी रेती वाहतूक शहरात पहाटेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत अनेक ट्रकद्वारे केली जाते. या ट्रकची संबंधित विभागाकडे नोंद होऊ नये म्हणून नंबर प्लेटवर खोडतोड करून बिनधास्त वाहतूक केली जात असल्याचे ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हे ट्रक शहरात अमरावतीत नांदगाव पेठमार्गे शहरात दाखल होतात.
प्रशासनाचे आश्चर्यकारक मौनशहरात पहाटे ४ पासूनच रेती वाहतुकीचा सुळसुळाट असतो. ही बाब प्रशासनात ‘टॉप टू बॉटम’ माहिती आहे. ट्रकच्या नंबर प्लेटमध्ये खाडाखोड होत असताना आरटीओ, पोलिस, महसूल प्रशासन या एकंदर प्रकारावर स्तब्ध का, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.