ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

Latur NEET Exam : NEET परीक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त..!

लातूर  :- लातूर जिल्ह्यात चार मे रोजी 51 केंद्रावर होणाऱ्या नीट  परीक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात 5 उपविभागीय पोलीस अधिकारी, 60 पोलीस अधिकारी, 391 पोलीस अमलदार तर 300 होमगार्डचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातून 20 हजार 801 विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

5 डीवायएसपी, 60 अधिकारी यांच्यासह शेकडो पोलीस तैनात!

एकाच सत्रात 4 मे रोजी दुपारी होणाऱ्या या परीक्षेसाठी केंद्रावर आधीच बायोमेट्रिक हजेरीसाठी पोहोचावे लागणार आहे. दरम्यान, सदरची परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट-2025 ही परीक्षा 04 मे 2025 रोजी दुपारी 2 ते 5 लातूर जिल्ह्यातील विविध 51 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर  एक पोलीस अधिकारी व इतर पोलिस अमलदारां चा बंदोबस्त देण्यात आला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार असून परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता लातूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.