ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
व्हिएमव्ही कॉलेज मागील रस्त्यावरून जड वाहनांना बंदी व स्वच्छतेसाठी मागणी

अमरावती – कठोरा नाका ते पाठ्यपुस्तक मंडळ रोड हा व्हिएमव्ही कॉलेजच्या मागील बाजूस असलेला अरुंद रस्ता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, ट्रक आणि जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा साचणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
रहिवाश्यांनी महानगरपालिकेकडे निवेदन देऊन जड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करण्याची आणि स्वच्छतेसाठी नियमित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, आनंद दरणे आशा दरणे नागरिकांच्यावतीने आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.