क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

Parbhani: जीम मधील तरुणांना टरमाईन इंजेक्शनची विक्री.!

नवा मोंढा पोलिसात एकावर गुन्हा दाखल! परभणीत टर्मिन येथे कुठून मुखिया सापडणं..!

परभणी : झटपट शरीरयष्टी  कमविण्यासाठी जीम  मधील तरुण टरमाईन सारख्या घातक इंजेक्शनचा वापर करत आहेत. पोलिसांनी या कारवाईत 10 हजार रुपये किंमतीच्या टरमाईन इंजेक्शनच्या 30 बॉटल आणि एक दुचाकी मिळून 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  केला आहे. ही कारवाई 4 एप्रिल रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास कस्तुरबा गांधी विद्यालय मैदान परिसरात करण्यात आली.

इंजेक्शनसह 60 हजाराचा मुद्देमाल जप्त!

औषध निरीक्षक मनोज पैठणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेख महेबुब शेख माजीद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा औषध विक्री परवाना नसताना, टरमाईन इंजेक्शन घेऊन जीम मधील तरुणांना विक्री करण्यासाठी स्वत:जवळ बाळगताना मिळून आला. या कारवाईत संबंधीताजवळ इंजेक्शनच्या 30 बॉटल आढळून आल्या. या प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. मुन्ना देशमुख करत आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.