ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

Sand Smuggling: परभणीच्या आलापुर पांढरी परिसरातून वाळूची तस्करी

पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा…!

परभणी  : तालुक्यातील आलापुर पांढरी या गावालगत असलेल्या नदीपात्रातू रात्री – बेरात्री मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा जोरदारपणे सुरू आहे. पोलीस यंत्रणा व महसूल विभागाने आलापुर पांढरी येथील  वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी परीसरातील ग्रामस्थांतून होत आहे.

परभणी तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष

परभणी तालुक्यातील आलापुर या गावापासून जात असलेल्या नदीच्या पात्रात या ठिकाणी मंदीर परिसराच्या पाठीमागे या ठिकाणी कुठलेही टेंडर काढण्यात आलेले नसताना बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा व वाहतूक होत आहे.टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे वाळूची मोठ्या प्रमाणावर उपसा व वाहतूक सुरू आहे. आलापूर पांढरी या गावातील मंदीर परिसरात पाठीमागे नदीपात्रातून वाळुचा उपसा करून परभणी वसमत रोडवरील या राष्ट्रीय महामार्गावरून वाळू उपसा केलेले ओव्हरलोड टिपर धावतात.

या रोडवर नेहमीच पोलिस अधिकारी, कर्मचारी व महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची या रोडवर नेहमीच रेलचेल असते मात्र अवैध वाळू उपसा करुन ओव्हरलोड सुसाट वेगाने जात वाळू वाहतूक करणारे टिपर दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने आलापुर पांढरी या गावालगतच्या जात नंदीच्या पात्रातून होत असलेल्या  अवैध वाळू उपसा व वाहतूकीला सुट दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महसूल प्रशासनाकडून यावर ठोस कारवाई होत नसल्याने विभागाच्या संमतीने सुरू आहे कि काय? असा प्रश्न स्थानिक नागरिकातून उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातून नागरिकांमधुन होत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.