क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
कुटुंबीयांना ठार करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तिवसा : स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १५ वर्षीय मुलीला कुटुंबीयांना ठार करण्याची धमकी देत वर्धा जिल्ह्यातील युवकाने अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तिवसा पोलिसांनी आदित्य राजकुमार केचे (२५, रा.जि. वर्धा) विरुद्ध १९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला.
मुलीच्या तक्रारीनुसार, ती तिच्या घरापुढे एकटी बसली असताना आदित्यने तिच्याशी ओळख केली आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत वारंवार अत्याचार केले. कुटुंबीयांना काहीही सांगितल्यास त्यांना ठार करण्याची धमकी त्याने दिली. १ ते ३१ जानेवारी दरम्यान हा घटनाक्रम घडला. ती दोन महिन्यांची गर्भवती झाली आहे. तिवसा पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.