ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र
कापसाचा ट्रक जळून खाक

नांदगाव खंडेश्वर : समृद्धी महामार्गावर मंगरूळ चवाळानजीक प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेजवळ शनिवारी रात्री पावणेतीनच्या सुमारास रुईगाठी वाहून येणारा ट्रक अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.
ट्रक परभणीहून कोलकाताकडे निघाला होता. शेवटच्या टोकाला आग लागल्याचे इतर चालकांनी सूचित केले.चालकाने तातडीने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. पण, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. मंगरूळ चव्हाळा व नांदगाव खंडेश्वर पोलिसांना ही माहिती मिळताच नांदगाव ठाण्याचे दिनेश वानखडे, प्रशांत पोपळे व मंगरूळ चवाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नांदगाव व कारंजा लाड येथून अग्निशामन दलाला पाचारण केले. मुंबईहून नागपूरकडे जाणारी वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती.