शशिकांतजी मंगळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित..!
आदर्श गोशाळा निर्मिती बद्दल नाशिक येथे पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी भारताचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहा एप्रिल रोजी रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे माननीय पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर व आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३८ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला. यामध्ये कसबेगव्हाण चे सरपंच सामाजिक कार्यकर्ते शशिकांतजी मंगळे यांना जय किसान फार्मर्स फोरम तर्फे कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शशिकांतजी मंगळे कृषी क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ख्याती प्राप्त असून त्यांनी आदर्श गोशाळा निर्मिती केलेली आहे. गो शाळेतील शेणखतापासून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर त्यांचा भर असून विविध सेमिनार घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती चे कार्य ते करत असतात .तसेच शेतकऱ्याच्या उज्वल भविष्यासाठी विविध उपक्रम ते राबवित असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.