भाजपच्या अंजनगाव सुर्जी शहराध्यक्ष सिंहासनावर माजी युवा जिल्हाध्यक्षांची वर्णी;तर तालुकाध्यक्ष पदात चेहरा बदल

प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी – भाजपच्या शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आव्हानाला सामोरे जाणारा तगडा शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या भाजपने जाहीर केल्या असून अंजनगाव सुर्जी येथील नवीन बस स्थानक समोर 20 एप्रिल 2025 रोजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष साजरा केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी अंजनगाव सुर्जी शहराध्यक्ष पदात खांदेपालट करून अंजनगाव सुर्जीचे नवीन शहराध्यक्ष म्हणून माजी युवा जिल्हाध्यक्ष मनीष मेन यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यांची प्रखर संघ कार्यकर्ता,सक्रिय सदस्य तसेच संघटन कौशल्य बळावर ओळख आहे.तर तालुकाध्यक्षपदी सुधीर गोळे यांची निवड करण्यात आली.यावेळी शहर व तालुक्यातील संपूर्ण भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तर या नव नियुक्त्या जाहीर झाल्याने शहरासह तालुक्यात भाजपच्या राजकीय समीकरणात पक्षांतर्गत संभ्रमावस्था कलह संपुष्टात येण्याची चिन्हे राजकीय अभ्यासाकांकडून वर्तविली जात आहे.त्यामुळे आता पुढील राजकीय गणिती समीकरणात आणखी काय बदल होणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.