कारला येथे आदिवासी विकास अमरावती अंतर्गत शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी –अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती अंतर्गत शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा तालुक्यातील कारला येथे दि.22 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाली.
तर कारला येथील गुरूमाऊली अनुदानित (प्राथ./माध्य.) आदिवासी आश्रम शाळेमध्ये झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेला आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी उद् घाटक म्हणून लाभले.तर गुरूमाऊली अनुदानित आदिवासी आश्रम शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरराव दाळू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद पेढेकर,सहायक आयुक्त शाम मक्रमपुरे,तज्ञ प्रशिक्षक राहुल ठोंबरे,सहायक प्रकल्प अधिकारी एम.पी.केंद्रे,सहायक प्रकल्प अधिकारी एस.आर.शेख यावेळी उपस्थित होते.
तसेच संपन्न झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेदरम्यान उपस्थितांसमोर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक दृष्टिकोनातून गणित आणि विज्ञान विषयाचे ज्ञान गांभीर्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावे असे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन करताना म्हटले.
या एकदिवसीय कार्यशाळेला संभाजी नगर,अकोला,धारणी,पुसद प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवाहर गाढवे यांनी केले व आभार प्रदर्शन एम.पी.केंद्रे यांनी केले.तसेच मुख्याध्यापक के.के.देशमुख,कोषाध्यक्ष प्रियंकाताई दाळू व शाळेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम सहकार्य सह कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.