ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
जलवाहिनी दुरूस्तीचे कार्य युध्दपातळीवर

परतवाडा : अचलपूर शहरातील मुख्य रस्ता असलेल्या परतवाडा-अचलपूर मार्गावरील दर्यासमोर जलवाहिनीला गळती लागल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
उन्हाळ्याच्या या दिवसांत शहरातील बहुतांश भागात पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी दुरुस्तीचे कार्य युध्दपातळीवर सुरु करत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पुर्ण केले आहे. या जलवाहिनीला गळतीमुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा उद्या सायंकाळपर्यंत नियमित केल्या जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता मनिष शर्मा यांनी दिली आहे. उद्या सकाळी परतवाडा तर सायंकाळपर्यंत अचलपूर शहराला पाणीपुरवठा नियमित होणार असल्याचे म्हटले आहे.