बडनेरा उड्डाणपुलावर अपघात, एकाचा मृत्यू

बडनेरा : गांधी विद्यालयासमोरील महामार्गावरच्या उड्डाणपुलावर पिकअप वाहनाने दुचाकीला कट मारल्याने कोसळलेल्या दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. ही घटना शनिवारी उशिरा रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, संघराज संपतराव डोंगरे (३२, रा. लड्ढा प्लॉट, नवीवस्ती) असे मृताचे, तर साहिल अशोक माटे (२६, रा. अशोकनगर, नवीवस्ती) असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही दुचाकीने अमरावतीहून रात्री साडेअकराच्या सुमारास बडनेराकडे येत होते. महामार्गावरील उड्डाणपुलावर अकोल्याकडून अमरावतीकडे जात असलेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला कट मारला. त्यानंतर तोल जाऊन दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले. दुचाकी संघराज चालवित होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.