ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

India Caste Census 2025: मोदी सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 74 वर्षांनंतर भारतात पुन्हा होणार जातीय जनगणना

नवी दिल्ली  : 1947 पासून आजपर्यंत भारतात जातीय जनगणना झालेली नाही? आता केंद्र सरकारने एक ऐतिहासिक आणि मोठे पाऊल उचलले आहे. येत्या  जनगणनेत जातीचा डेटा समाविष्ट केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

#WATCH | Delhi | “Cabinet Committee on Political Affairs has decided today that Caste enumeration should be included in the forthcoming census,” says Union Minister Ashiwini Vaishnaw on Union Cabinet decisions. pic.twitter.com/0FtK0lg9q7

— ANI (@ANI) April 30, 2025

 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी म्हणाल्या की, ‘अनेक राज्यांनी त्यांच्या पातळीवर जात सर्वेक्षण केले. परंतु ते वैज्ञानिक आणि पारदर्शक नव्हते. यामुळे समाजात संशय निर्माण झाला. म्हणूनच आता जात गणना, जनगणनेचा भाग बनवली जात आहे. जेणेकरून हे काम पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होईल.

जात जनगणना कधी होणार?

सरकारची योजना आहे की,  जनगणना प्रक्रिया सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊ शकेल. संपूर्ण काम 2 वर्षात पूर्ण होईल, म्हणजेच अंतिम आकडेवारी 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला येऊ शकते.

राज्यांचा अनुभव आणि राजकारणाचा रंग

2022 मध्ये सर्व जातींची गणना पूर्ण करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशनेही अलीकडेच जात सर्वेक्षण केले. काही पक्षांनी केवळ राजकीय फायद्यासाठी  जातीय जनगणनेचा वापर केल्याचा सरकारचा आरोप आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.