ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
नांदेड रेल्वे स्थानकावर माँक ड्रिलचा थरार..!

नांदेड :- भारत – पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ७ मे रोजीपासून मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार नांदेड रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आला.याचा थरारक अनुभव प्रवाश्यांना प्रत्यक्षात अनुभवला.
युद्धजन्य परिस्थिती बाबत नांदेडमध्ये माँक ड्रिल
भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा केला आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने नांदेड रेल्वे स्थानकावर बुधवारी पर्यटक व रेल्वे प्रवाशाच्या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेण्यात आला. लोहमार्ग पोलीस,नांदेड पोलीस व एटीएस, क्यूआरटीचे अधिकारी, श्वानपथक, अग्निशमन दल यांनी संयुक्तपणे हे मॉक ड्रिल केलेले आहे. प्रवाश्यांना याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. यावेळी प्रवाशांनी मॉक ड्रिलचा थरार अनुभवला.