दर्गा रोडचे काम निकृष्ट; नागरीकांच्या अडचणी वाढणार!
येणार्या पावसाळ्यात वेळेत काम पूर्ण न झाल्यास, नागरिकांच्या अडचणी वाढणार!

परभणी : मागील दीड ते दोन वर्षापासून शहरातील दर्गा रोड परिसरात च्या रस्त्याचे काम चालू आहे. सध्या नाली व गट्टूचे काम चालू असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. येणार्या पावसाळ्यात काम वेळेत पूर्ण न झाल्यास, या रोडवरील सर्व नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
कंत्राटदाराची उदासिनता; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष!
परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडे यापूर्वी अनेकांनी परभणी शहरातील चालू असलेले, मुख्य रस्त्यांचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याच्या तक्रारी केल्या. या तक्रारीकडे लोकप्रतिनिधीने देखील दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदाराची हिंमत दिवसें दिवस वाढत आहे. लोकप्रतिनिधींनी टक्केवारी घेतली असल्याची चर्चा आता सामान्य माणसात होत आहे. मुख्य रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांमार्फत देखरेख केली जात आहे. बांधकाम विभाग अधिकार्यांकडे देखील वेळोवेळी तक्रार करूनही रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण केली जात नाहीत. दर्गा रोड परिसरात मागील दीड वर्षापासून रस्त्याचे काम हे खूप संथगतीने चालू असल्यामुळे, नागरिकांना रहदारी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज या भागातील वाहतूक विस्कळीत होत आहे. सध्या या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असताना, रस्त्याच्या बाजूने गट्टू टाकण्याचे व नाली बनवण्याचे काम चालू आहे. हे काम अंदाज पत्रकाप्रमाणे होत नसून, अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. कामाची गुणवत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी आत्ताच तपासावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. गट्टू टाकण्यात आलेले आत्ताच खाली दबत असल्याचा प्रकार समोर येत आहे. पावसाळ्यात गट्टू व नालीच्या निकृष्ट कामामुळे वाहतुकीच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यासाठी आता नागरिकांना परत आंदोलन करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे. परभणी शहरातील जांब नाका ते दर्गा रोड या रस्त्याचे काम मागील दिड वर्षापासून संथगतीने सुरु आहे. या मार्गावर असलेल्या स्त्री रुग्णालयात येणार्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.
पालकमंत्री लक्ष देतील का ?
परभणी शहरातील मुख्य रस्त्यांची कामे सध्या अत्यंत संत गतीने चालू आहे. या संदर्भात अनेक तक्रारी देखील दाखल झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टक्केवारीत अडकल्यामुळे कंत्राळदाराची हिम्मत वाढत चालली आहे. तेव्हा परभणी शहरातील नागरिकांच्या वतीने परभणीच्या पालकमंत्री ना मेघना साकोरे बोर्डीकर यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
कामाची गुणवत्ता तपासावी!
दर्गा रोड परिसरात चालू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी या रस्त्याची गुणवत्ता तात्काळ तपासावी. कारण पावसाळ्यात रस्ता जगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नालीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने रस्ता दबणार आहे तेव्हा गुणवत्ता तपासून घ्यावी. अॅड. मुजाहिद खान, काँगे्रस नेते