ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

महानगरपालिकेवर ‘नगरोत्थान’चा ७२ कोटींचा भार; पेलणार कसा?

अमरावती : राज्य शासनाची नगरोत्थान योजना आणि जिल्हा विकास समितीच्या निधीतून महानगरपालिका क्षेत्रात सुमारे २२१ कोटींची विविध विकास कामे सुरू आहेत. त्यापैकी काही कामे पूर्णत्वास आली, तर काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. असे असले तरी महापालिकेवर ‘नगरोत्थान’चा ७२ कोटींचा भार कायम आहे. विधासनभा निवडणुकीपूर्वी अमरावती आणि बडनेरा मतदारसंघात ही कामे मंजूर झाली होती, हे विशेष.

राज्य शासनाच्या नगरोत्थान योजनेतून १५० कोटी आणि जिल्हा विकास समितीच्या नगरोत्थामधून ७१ कोटींची विविध विकासकामे महानगरात सुरू आहे. यात साधारणतः काँक्रीट डीपी रोड करण्यात येत आहे. नगरोत्थानच्या विकासकामांना आ. रवी राणा, आ. सुलभा खोडके यांनी निधी मंजूर करून आणला आहे. मात्र, राज्य शासनाकडून नगरोत्थान योजनेसाठी तोकडा निधी मिळत असल्याने काही कंत्राटदारांनी निधीअभावी तूर्त कामे बंद केली आहेत. दुसरीकडे महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक स्थिती फारच नाजूक आहे. अशातच ‘नगरोत्थान’च्या ७२ कोटींचा भार महानगरपालिका कसा सहन करणार, हा हल्ली महत्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी महानगरपालिकेला निधीची चणचण भासत असताना नगरोत्थानची ३० टक्के रक्कम अर्थात ७२ कोटी उभे करणे आयुक्तांपुढे कसरत ठरणारे आहे.

 

२२१ नगरोत्थान’ची कामे पूर्ण होताच कंत्राटदारांना देयके द्यावी लागेल. त्यामुळे आयुक्त सचिन कलंगे यांच्यापुढे ७२ कोटींचा निधी उभारण्याचे मोठे आव्हान आहे.

कोटी रुपयांची नगरोत्थानची कामे मंजूर

रस्त्यांचे जाळे उभारले जातेय

अमरावती आणि बडनेरा मतदारसंघात शहरी भागात ‘नगरोत्थान’ योजनेतून सिमेंट क्राँक्रीटच्या रस्त्याचे जाळे उभारले जात आहे. भविष्यात हे रस्ते विकासाचे नवे दालन उभे करतील. मात्र, हल्ली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. त्यामुळे महानगरपालिकेवर ७२ कोटींचा भार म्हणजे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात नागरिकांवरच येणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

साधारणतः २२१ कोटींची विकासकामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी ३० टक्के वाटा महानगरपालिकेला द्यावा लागणार आहे. नगरोत्थानचे १०० टक्के अनुदान द्यावे, यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाने पाठविण्यात आला. मात्र, याविषयी शासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

सचिन कलंत्रे, महानगरपालिका आयुक्त

हे आहेत प्रमुख रस्ते

———————————————————————

साईनगर ते गोपालनगर

——————————————————————–

पाठ्यपुस्तक मार्गावरील रस्ता

—————————————————————–

बडनेरा नवीवस्ती, अशोकनगर ते होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूल

———————————————————–

छत्री तलाव ते दस्तुरनगर चौक

——————————————————-

लाईन शेगाव नाका ते टॉवर लाईन

 


 

राज्य शासनाने नगरोत्थान योजनेसाठी निधी मंजूर केला. कामाचे स्वरूप बघूनच देयके दिली जातात. त्यामुळे योजनेचा निधी मागे-पुढे मिळणारच आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सर्वश्रुत आहे. त्यामुळे ३० टक्के निधीबाबत शासनस्तरावर सकारात्मक मार्ग काढला जाईल.

सुलभा खोडके, आमदार अमरावती.

 

विकासकामे पूर्ण करण्यासाठी निधी खेचून आणणार आहे. जुन्या कामांच्या देयकांसाठी निधी मंजूर करून घेतला. डीपीसीतून निधी मंजूर झाला. केंद्र सरकारच्या सीआरएफमधून १७५ कोटी मंजूर झाले. महापालिका प्रशासनाची घडी सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे.

रवी राणा, आमदार, बडनेरा

 

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.