ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

साताऱ्याचा ‘ढाण्या वाघ’ किरण माने जंगलात अन् अचानक समोर आला वाघ…

साताऱ्याचा ‘ढाण्या वाघ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता किरण माने यांना वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात वाघिणीने तिच्या बछड्यासह थेट दर्शन दिले.

नागपूर : अभ्यासपूर्ण वाणी आणि लेखणीने भल्याभल्यांना घाम फोडणारा साताऱ्याचा ‘ढाण्या वाघ’ अशी ज्याने आपली ओळख निर्माण केली आहे, त्या ‘ढाण्या वाघा’ला म्हणजेच अभिनेता किरण माने यांना वाघिणीने तिच्या बछड्यासह दर्शन दिले.
एका वाघाने दुसऱ्या वाघिणीला साद दिली आणि दोघांचेही कुटुंब समोरासमोर आले. विदर्भात कार्यक्रमानिमित्त आलेल्या अभिनेता किरण मानेसोबत यावेळी त्यांचे कुटूंबिय देखील होते.विदर्भात आल्यानंतर व्याघ्रदर्शन करणार नाही, असे सहजासहजी कुणी करत नाही. त्यातून हा तर साताऱ्याचा ‘ढाण्या वाघ’. त्यांच्यासोबत मित्र हरिश इथापे, संजय इंगळे तिगावकर होते आणि मग त्यांनी रात्रीतूनच व्याघ्रदर्शनाचा कार्यक्रम आखला. मध्यरात्रीपर्यंत गप्पांचा फड रंगल्यानंतरही पहाटे साडेपाच वाजता ते वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रसफारीला निघाले.खरं तर माने यांच्या मुलीने याआधी जंगलात सफारी केली होती, पण त्यांच्यासाठी ही पहिलीच सफारी होती.

 

विदर्भात आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी बोर व्याघ्रप्रकल्पात पाऊल ठेवले. बोरधरण प्रवेशद्वारातून समोर जात नाही तोच साताऱ्याच्या या ‘ढाण्या वाघा’ला बोर व्याघ्रप्रकल्पातील ‘बीटीआर-३’ म्हणजेच ‘कॅटरिना’ ही वाघीण त्यांच्यासमोर आली. ती एकटीच नव्हती तर तिचे बछडे देखील तिच्यासोबत होते. एकीकडे ‘माने’ यांचे कुटुंबिय तर दुसरीकडे ‘कॅटरिना’चे कुटुंब आणि दोघेही एकाक्षणी समोरासमोर आले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.