ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

पालघर : प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा; पालकमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

परदेशातून येणाऱ्या रबर टायरचे पायरोलिसिस करून त्यापासून वेगवेगळे घटक उत्पादन करणारे वाडा तालुक्यात सुमारे ७० कारखाने आहेत, परंतु या कारखान्यातून निघणारा धूर आणि धूलिकणांमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

एमपीसीबी’ची कारवाईची पद्धत कशी?

प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची पाहणी करून पायरोलिसीस उद्योगाला परवानगी दिली जाते. उत्पादनादरम्यान पाहणी करताना ही यंत्रणा कार्यक्षम पद्धतीने वापरात नसल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रथम उद्योगाला कारणे दाखवा नोटीस नंतर उत्पादन बंद करण्यासाठी प्रस्तावित नोटीस देऊन उद्योगांकडून त्यांचे म्हणणे मागविले जाते. यानंतर उत्पादन बंद करण्यासाठी अंतिम नोटीस देऊन नंतर उत्पादन बंद करण्याची कारवाई केली जाते. यामुळे ही प्रक्रिया राबवण्यास काही महिन्यांचा अवधी लागतो. यात उद्योजक प्रत्यक्षात कारवाईला विलंब होण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसून येतात. उत्पादन बंद केल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातलेल्या अटी-शर्ती व नियमांचे पालन करणारी यंत्रणा उभारल्याचे दाखवावे लागते. त्यानंतर उत्पादनास परवानगी दिली जाते.

बाधित गावे

टायर्सवर प्रक्रिया करणारे ५२ कारखाने वाडा तालुक्यात आहेत. उसर, दिनकरपाडा, वडवली, बिलोशी, पालसई, सापना, किरवली, नेहरोली, तोरणे, कोन, कोनसई अशा गावांमध्ये हे कारखाने कार्यरत आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.