ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मेळघाटातील रस्ते-बस गाड्यांची दुरवस्था संपणार की नाही?

तालुक्यात दोन बस पडल्या बंद, प्रवाशांना बसावे लागले ताटकळत

धारणी : एकीकडे मेळघाटात खड्यांच्या रस्त्यांमुळे बस खिळखिळ्या झाल्या आहेत, तर दुसरीकडे खिळखिळ्या बसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या दुर्गम परिसरात केव्हाही बस बंद पडून प्रवाशांना ताटकळत राहावे लागू शकते. रविवारी त्याचा प्रत्यय प्रवाशांना आला. सकाळी ६ वाजता दर्यापूरला जाणारी एसटी बस धारणीपासून १५ किलोमीटर अंतरावरील बोड फाट्याजवळ बंद पडली. अमरावती ते धारणी जाणारी टपाल बसदेखील घटांगजवळ बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

मेळघाट आणि समस्या हे एकमेकाला पूरक बनले आहे. येथील समस्या डोंगरभर असून, त्यावर उपचार मात्र शून्य आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत शहरात मिळणाऱ्या सुविधा सोडा, मेळघाटातील वाहतुकीचे एकमेव साधन असलेल्या एसटी बसदेखील त्रासदायक ठरत आहे. अलीकडच्या काळात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बस केव्हा बंद पडेल आणि चालता चालता एसटी बसमध्ये कधी बिघाड निर्माण होईल, याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे मेळघाटात भंगार बस पाठवू नये आणि सुस्थितीत असलेल्या बस या मार्गावर चालवाव्यात, अशी मागणी पुष्कळ दिवसांपासून नागरिकांकडून होत आहे.

रस्त्याची बांधणी करा परतवाडा ते धारणी हे घाट वळणाचे मार्ग असून, या मार्गावर जागोजागी अपघात होऊ नये म्हणून शेकडो गतिरोधकाची निर्मिती केली आहे. मात्र, रस्त्याची बांधणी कुठेही नाही. त्यामुळे रस्त्याची बांधणी करण्याची मागणी होत आहे.

किरकोळ दुरुस्तीनंतर बस मेळघाटात धारणी मुख्यालयाला जवळपास २५ बस दररोज येतात. या बस स्थानकाऐवजी जवळपासच्या गावांमध्ये मुक्कामी तर कधी सकाळी जाऊन दुपारी परत येणे असे वेळापत्रक राबविले जाते. नादुरुस्त झालेली बस मेकॅनिकल काम केल्यानंतर पुन्हा धारणीला पाठविण्यात येते. किरकोळ दुरुस्तीमुळे या बस पुन्हा बंद पडत आहेत.

बस आगार आवश्यक उपविभागीय आणि तालुका मुख्यालय असलेल्या धारणीला बस आगार नाही. मेळघाटचा व्याप अवाढव्य आहे. धारणी ते अमरावती मुख्यालयाचे अंतर दीडशे किलोमीटर असून एसटी डेपो परतवाडा येथे शंभर किलोमीटर अंतरावर आहे. तथापि, धारणीला येणारी प्रत्येक बस ही अमरावती किंवा परतवाडा डेपोतून पाठविली जाते.

रस्त्यांची बिकट स्थिती मेळघाटातील रस्ते अत्यंत बिकट आहेत. धारणी-अमरावती मुख्य मार्गदेखील त्याच पठडीतील झाला आहे. धारणी ते सेमाडोह आणि सेमाडोह ते घटांगपर्यंत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्यामुळे या मार्गाने परतवाडाहून निघणाऱ्या एसटी बस धारणीला पोहोचतील किंवा धारणीवरून निघालेली बस परतवाड्याला पोहोचेल, याची हमी नसते. कधीही बस फेल होऊन प्रवाशांना होऊ शकतो.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.