ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर

अमरावती : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे १० एप्रिल रोजी जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानुसार सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ६० व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर ११.४५ वाजता पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील डायलेसीस सेंटरचे उद्घाटन करतील. दुपारी १२.३० वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या सानुग्रह अनुदान निधी वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम आणि संवाद कक्षाचे उद्घाटन करतील. २ वाजता अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसुली वाचनालयाचे लोकार्पण करतील.