हिंदू पर्यटकांवर झालेल्या पहलगाम दहशतवादी भ्याड हल्ल्या विरोधात शिवसेना आक्रमक
परतवाडा जयस्तंभ चौकात पाकिस्तान विरोधात प्रचंड नारेबाजी

अचलपूर प्रतिनिधी– जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक हिंदू भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला याचा निषेध जयस्तंभ चौक, परतवाडा येथे शिवसेना, युवासेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. ठाकूर प्रमोद सिंह गड्रेल आणि युवासेना जिल्हा प्रमूख प्रितेश अवघड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख विवेक महल्ले, परतवाडा शहर प्रमुख विलास सोळंकी, अचलपूर शहर प्रमुख आतिश अहिर यांच्या नेतृत्वात झालेल्या निषेध आंदोलनात निष्पाप हिंदू पर्यटकांची निघुण हत्या करणाऱ्या विरोधात पाकिस्तान मुर्दाबाद,आतंकवाद मुर्दाबाद, प्रचंड नारे बाजीने परिसर दणाणून गेला होता. शिवसेनेचे आंदोलन असल्याने पोलिसांनी दुपारपासूनच आंदोलन भागात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण देशात पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधात रोष व्यक्त होत आहे. आतंकवाद्यांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशा प्रकारची कारवाई भारत सरकारने करावी अशी मागणी आंदोलनात दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी अरविंद सुरवोसे सर,राजू केदार,संजू हिरपुरकर ,महिला आघाडी तालुका प्रमुख वनिता देशमुख,महिला शहर प्रमुख श्रद्धा विटाळकर ,उपशहर प्रमुख सुनिल चित्ते,उपशहर प्रमुख रितेश कोठाळे,पंकज पर्वतकर, राम मासोदकर,युवासेना शहर प्रमुख विशाल गौर,राहुल वखरे,मोहन गौर,पवन फाटे,बाबा चावरे, निलेश गुहे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.