‘यू-डायस’वर माहिती भरण्यात तीन तालुके अव्वल, जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर
जिल्ह्याचे ९९.७८ टक्के उद्दिष्ट पूर्ण : दर्यापूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे तालुक्यांची दमदार कामगिरी

अमरावती : शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण असलेल्या ‘यू-डायस’ प्रणालीत विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती भरण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने संबंधित सर्वांनाच दिले आहेत. यू-डायस म्हणजे युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन, दर्यापूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे या तीन तालुक्यांचे काम १०० • टक्के पूर्ण झाले आहेत.
यापाठोपाठ अचलपूर, अमरावती, मनपा क्षेत्र, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा आणि वरूड या तालुक्यांनी ९९ टक्क्यांहून अधिकारी काम पूर्ण केले आहे. एकंदरीत जिल्ह्यात यू-डायसवर माहिती भरण्यात अमरावती जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ७६ हजार ५१३ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ७५ हजार ४४५ विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. उर्वरित २३५८ पैकी २४५ एका विद्यार्थ्यांसाठी लागतात किमान पाच मिनिटे दहावी, बारावीच्या परीक्षा आटोपल्या आहेत. परिणामी, परीक्षांच्या कालावधीत माहिती भरण्यास अडचणी आल्या. तसेच ‘यू-डायस’वर माहिती भरण्यासाठी एका विद्यार्थ्यासाठी किमान पाच मिनिटे लागतात. शंभर विद्यार्थ्यांना ५०० मिनिटे म्हणजेच आठ ते नऊ तास लागतात. त्यातच स्थलांतरित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड उपलब्ध नसणे अशा नानाविध तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांची माहिती भरणे अपूर्ण राहिले आहे.
८२५ विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम सध्या सुरू आहे. एकूण ८२३ विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम सध्या बाकी आहे. हे काम युद्धपातळीवर केले जात आहे.
विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने यू-डायस प्लस प्रणाली विकसित केली आहे. समग्र शिक्षा तीन तालुक्यांचे काम १०० टक्के पूर्ण जिल्ह्यातील चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आणि दर्यापूर या तीन तालुक्यांचे काम १०० टक्के झाले आहे.
योजनेचे आगामी वर्षाचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता या प्रणालीचा वापर केला जातो. यासाठी जिल्हा, महापालिका व तालुका तसेच शाळास्तरावरील माहिती यू-डायस प्लस ऑनलाइन प्रणालीमध्ये भरण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम सध्या सुरू आहे.