रिद्धपुरातील बसस्थानक चार महिन्यांपासून अंधारात

मोर्शी : तालुक्यातील श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील बसस्थानक परिसरातील पथदिवे चार महिन्यांपासून बंद आहेत. ते त्वरित सुरू करण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद हरणे यांनी दिला आहे. यादरम्यान रस्ताओलांडताना दोन पादचाऱ्यांचे अपघात होऊन ६० वर्षीय इसम मृत्युमुखी पडला, तर दुसरा इसम अमरावती येथे खासगी इस्पितळात उपचार घेत आहे.
कंत्राटदार कंपनीने अमरावती ते चांदूर बाजार मार्गाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर पथदिव्यांचे काम ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे ग्रामपंचायतीने अद्याप ती योजना स्वीकारली नाही म्हणत हातवर केले. महावितरण अधिकाऱ्यांनी मात्र कंत्राटदार कंपनीकडे वीज बिल थकले असल्याचे सांगितले. रिद्धपूर हे तीर्थक्षेत्र व महानुभाव पंथाची काशी आहे. आता देशभरातील महानुभावपंथीय व पर्यटक देवदर्शनासह आनंद लुटण्यासाठी रात्री-अपरात्री या ठिकाणी येतात.