ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण
दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा करण्यात आला निषेध

प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी –काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच शहर व ग्रामीण मंडळाच्या वतीने पानअटाई येथे दि.२३ एप्रिल २०२५ रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भाजपा शहर,ग्रामीण मंडळ व महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली आणि दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.तसेच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.