चुरणी येथे पाण्याची भीषण टंचाई; नागरिक त्रस्त

चिखलदरा : तालुक्यातील चुरणी ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत असून, या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून पाण्याची भीषण टंचाई आहे. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. चुरणी ग्रामपंचायतचासुद्धा व्याकडे लक्ष देत नसल्यामुळे पाणीटंचाईकडे कोण लक्ष देणार? अधिकारी व पदाधिकारी त्यांनीपाणीटंचाईवर लक्ष देण्याची गरज आहे.
याबाबत चुरणी गावातील महिलांनी व नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनीसुद्धा टंचाईकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतमधील सचिव सरपंचावर रोष व्यक्त केला आहे. गावाची लोकसंख्या चार ते पाच हजारांच्या घरात असून, पाण्याचे मोठे स्रोत या ठिकाणी उपलब्ध व्हायला हवे होते; मात्र शासनाने मर्यादित पाण्याचे सोर्स या ठिकाणी उपलब्ध केल्यामुळे या ठिकाणची सार्वजनिक विहीर कोरडी झाली.
त्यामुळे चुरणी गावाला पाणीपुरवठा होत नाही. या ठिकाणचे हॅण्डपंपसुद्धा सुकले आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चुरणीतील विहिरींनी तळ गाठला आहे.
या पाणीटंचाईमुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायतविरोधात रोष व्यक्त केला आहे. चुरणी गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.