जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने फुटाळा तलाव येथे मॉक ड्रिलचे आयोजन!

आपदा मित्र मास्टर ट्रेनर यांच्याद्वारे पावसाळ्यात येणाऱ्या पूर परिस्थितीला प्रभावीपणे हाताळण्यासाठी मान्सुन पुर्व तयारी!
नागपूर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या बैठकीनंतर, पावसाळ्यात येणाऱ्या पूर परिस्थितीला प्रभावीपणे हाताळण्यासाठी मान्सुन पुर्व तयारी करण्याकरीता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर तर्फे मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, नागपूर तसेच अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, नागपूर तर्फे श्रीमान तुषार बाराहाते, सहा. विभागीय अग्निशमन अधिकारी, यांच्या उपस्थितीत अग्निशमन विभाग, म.न.पा. नागपूर, NDRF, SDRF, होमगार्ड, वैद्यकीय पथक, व आपदा मित्र मास्टर टेर्नर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील फुटाळा तलाव येथे मॉक ड्रिल घेण्यात आली, सदर मॉक ड्रिल करिता अग्निशमन विभागाचे श्री. भगवान वाघ, प्र. केंद्र अधिकारी कॉटन माकेट, श्री. शिवाजी शिर्के, प्र. केंद्र अधिकारी सक्करदरा, श्री. दिलीप चव्हाण, प्र. केंद्र अधिकारी लक्कडगंज, श्री. सुरेश आत्राम, प्र. केंद्र अधिकारी त्रिमुर्तीनगर, श्री. रविंद्र मरस्कोल्हे, प्र. केंद्र अधिकारी नरेंद्रनगर, श्री. रविंद्र त्रिवेदी, उप अग्निशमन अधिकारी सुगतनगर, श्री. रुपेश माणके, उप अग्निशमन अधिकारी, मुख्यालय, तसेच प्रत्येक अग्निशमन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
DDMA नागपूर तर्फे राज्य आपत्ती प्रतिसाद दल समादेशक डॉ. प्रियंका नारनवरे सहाय्यक समादेशक कृष्णा सोनटक्के NDRF PI ऋषभ शर्मा, SDRF PI दादाराव दाते, PI सुरेश चौधरी, PSI संजय अब्रुक, PSI सुनील कराळे, PSI ईश्वर रंधई, PSI सोमनाथ भंडारे, PSI अमोल गोखले, PSI सारंग गुढधे, होमगार्ड चे PN देविदास भल्मे, पी. नागेश्वर राव, 108 आणि SDRF यांची मेडिकल टीम, व आपदा मित्र मास्टर ट्रेनर श्याम मस्के, मनोज मोहणे, सौरभ सिंह, राहुल जीबकाटे, धीरज सोनकुवर, मयुर हजारे, कलानी जुनुकर, आकाश ढोबळे, नंदनी प्रजापती व अनेक आपदा मीत्र जर होते.
1) प्रॅक्टीकल मॉक ड्रिल मध्ये दिलेल्या कार्यानुसार, अग्निशमन विभागाने प्रथम पाण्यामध्ये बुडत असलेल्या दोन व्यक्ती मधुन एका व्यक्तीला अग्निशमन विभागाने बोटच्या सहाय्याने सुरक्षीत रित्या रेस्कु करून बाहेर काढले, तसेच दुसऱ्या व्यक्तीला रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या सहाय्याने रेस्कु करून बाहेर काढण्यात आले.
2) SDRF चे कर्मचारी कार्यकरीत असतांना ची बोट पलटली असता, तीन जवान पाण्यामध्ये बुडत असतांना एका जवानाला अग्निशमन विभागाने व दोन जवानांना दलाने बोटच्या ससहाय्याने रेस्कु करून बाहेर काढण्यात आले.
3) आपदा मीत्रानी रेस्कुअरला प्रथम ऊपचार दीले. अशा प्रकारे उत्कृष्ट रित्या नागपूर येथील फुटाळा तलाव येथे मॉक ड्रिलचे कार्य पुर्ण करण्यात आले.