ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

पुसदच्या रोहित राठोडची १६ हजार फुट उंचीच्या लाउचुंग पर्वताला गवसणी

पुसद :- येथीलफूलसिंग नाईक महाविद्यालयातील येथील एनसीसी विभागातील वरिष्ठ अंडर ऑफिसर (SUO) रोहित दलपत राठोड यांनी ३ मे २०२५ रोजी सकाळी ११:२५ वाजता सिक्कीम मधील तिबेट (Tibet) सीमेपासून जवळ असलेल्या लाउचुंग पर्वत शिखरावर (१६,०३८ फूट उंचीवर) यशस्वी चढाई केली.ही मोहिम एनसीसी  तर्फे आयोजित २८ बेसिक माउंटेनियरिंग कोर्स अंतर्गत अतिशय कठीण व आव्हानात्मक होती. मात्र रोहित राठोड यांनी अत्युच्च जिद्द, शारीरिक व मानसिक ताकद यांच्या जोरावर हे यश मिळवले.

रोहित राठोड यांनी अत्युच्च जिद्द, शारीरिक व मानसिक ताकद यांच्या जोरावर हे यश मिळवले

लाउचुंग  शिखराच्या चढाई दरम्यान त्यांनी थंड हवामान, ऑक्सिजनची कमतरता आणि खडतर भूगोल अशा अनेक अडचणींवर मात केली. या मोहिमेसाठी लेफ्टिनेंट  अनुरंजन प्रकाश टेकाडे, एनसीसी अधिकारी, फूलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद यांनी रोहित राठोड यांना प्रेरित केले. रोहित राठोड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे फूलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद तसेच पुसद शहराचा गौरव वाढला आहे. जनता शिक्षण प्रसारक मंडळ, पुसदचे अध्यक्ष  जय नाईक व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसह एनसीसी विभागानेही त्यांच्या यशाचे विशेष कौतुक केले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.