डॉ. अश्विनी मडघे, व-हेकर यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाड्.मय पुरस्कार जाहीर

अमरावती जिल्ह्यातील साहित्यिक कवयित्री डॉ. अश्विनी मडघे, व-हेकर यांच्या साहित्यकृती ‘उत्तम बंडू तुपे कादंबरी विश्व’ आणि ‘काट्यावरची पोटं एक चिंतन’ या संशोधन साहित्य साहित्यकृतीला पुणे येथील मातंग साहित्य परिषदेचा 2025 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
हा पुरस्कार सोहळा म. ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे . पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते तसेच मातंग साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा भावी भारतीय विचार साधनेचे सभागृह,भावे हायस्कूल जवळ, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे येत्या रविवारी दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यापूर्वी 2024 साली त्यांच्या साहित्यकृतीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सदर पुरस्कारामुळे आपल्या लेखन कार्यास गती व साहित्य क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित आहेत तसेच विविध मासिक व कॅलेंडरमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध केले आहे.