ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मोठ्या सिंचन प्रकल्पातील पाणीपुरवठ्यावरील भार वाढणार

दोन दलघमीने मागणी वाढण्याची शक्यता

अमरावती : तापमानातील वाढीच्या परिणामी पाण्याची मागणी वाढू लागली आहे. मार्च महिन्यापासून दररोज दोन दलघमी पाणी हे पाणीपुरवठ्यासाठी खर्ची पडत असून आगामी अडीच महिन्यांत ती दुप्पट होण्याची शक्यता आहे. विद्यमान स्थितीत जिल्ह्यातील ५६ सिंचन प्रकल्पांत ५०४ दलघमी जलसाठा शिल्लक असून पाण्याची मागणी वाढत असल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यावरील भार वाढणार आहे.

जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या धरणासह सात मध्यम व ४८ लघुप्रकल्प

आहेत. या सर्व प्रकल्पांत विद्यमान स्थितीत ५०४ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. अप्पर वर्धा धरणावर अमरावती शहरासह ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबल्या आहेत. या धरणाची प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता ५६४ दलघमी एवढी असून सद्यस्थितीत २८६ दलघमी साठा शिल्लक आहे. पाणीपुरवठा योजनांना सात मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पांत १२३ दलघमी तर ४८ लघुप्रकलपात ९४ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याचे अडीच महिने शिल्लक आहेत. गतवर्षी पावसाने सरासरी ओलांडल्याने सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्यासाठी असलेल्या इतर स्रोतांमध्येही मुबलक पाणी उपलब्ध झाले. मात्र आता सिंचन प्रकल्प कोरडे पडू लागले आहेत.

जिल्ह्यातील पाणी साठ्याची स्थिती (दलघमी)

अप्पर वर्धा : २८६

शहानुर : २५

चंदभागा : २८

पूर्णा : २२

सपन : ३१

पंढरी : १३.६४

बोर्डा नाला : ०२

लघु प्रकल्प (४८)-९४

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.