जिल्ह्यात अवकाळी, विजांचा कडकडाट, वादळ

परतवाडा : गत आठवड्याभरापासून उन्हाचा पारा वाढला असताना अचानक बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात वातावरण बदलले, ढगांची दाटी होऊन कुठे वेगवान वारे वाहिले, कुठे विजांचा कडकडाट झाला, तर कुठे विजांसह अवकाळी बरसला. अचलपूर, परतवाड्यात बरसलेल्या अवकाळीने बाजार समितीत शेतमाल झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली.अ
चलपूर-परतवाडासह मोर्शी शहर तसेच तालुक्यातील लेहगाव, निंभी, तळणी, धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे धान्य भिजू नये, यासाठी कर्मचारी, हमाल, मापारी यांनी धावपळ करून ताडपत्री टाकली. शहरात सायंकाळी नागरिकांची धावपळ झाली.
वीज पुरवठाही झाला होता खंडीत कावली परिसरात वीज गूल अमरावती शहरात रात्री ८ च्या सुमारास विजांचा कडकडाट आणि पाठोपाठ पावसाला सुरुवात झाली. धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यासोबत वीजपुरवठासुद्धा खंडित झाला.