१२ वर्षे रिलेशनशिप, शरीरसंबंध अन् लग्नास दिला थेट नकार!
बलात्काराचा एफआयआर प्रेमाची अकाली अखेर

अमरावती : एका तरुणीला लग्नाचे आमिष देत तिचे सर्वस्व लुटण्यात आले. मात्र लग्नास थेट नकार दिल्याने पीडिताने अखेर पोलिस ठाणे गाठले. संबंधिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आणि १२ वर्षाच्या लव्ह इन रिलेशनशिपचा अकाली अंत झाला. ८ एप्रिल रोजी रात्री येथील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत तो प्रकार उघड झाला. घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपीला लागलीच अटक करण्यात आली.
राजापेठ पोलिसांनी ८ एप्रिल रोजी रात्री आरोपी सुरज संतोष बाहे (३२, रा. अमरावती) याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविला. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांना १२ वर्षांपासून ओळखतात. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. एकादिवशी आरोपीने तरुणीला प्रपोज केले. लग्नाची मागणी घातली.
वाढदिवस फिर्यादीच्या घरी केला साजरा ऑगस्ट २०२४ मध्ये आरोपी तरुणीला त्याचे घर दाखविण्यासाठी घेऊन गेला. आरोपीने त्यावेळी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान २७ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोपीचा वाढदिवस होता. आरोपीने फिर्यादी तरुणीच्या घरी तो साजरा केला. त्यावेळी देखील घरी कोणीही नसताना त्यांच्यात फिजिकल रिलेशनशिप झाली.
तरुणीला दिली धमकी तरुणीने आरोपीस वारंवार लग्नाबाबत विचारणा केली. मात्र तो टाळाटाळ करीत राहिला. दरम्यान १ एप्रिल रोजी फिर्यादीने आरोपीचे ऑफिस गाठून त्याला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र त्यावर मी तुझ्यासोबत लग्न करूच शकत नाही, तुला जे करायचे आहे, ते कर, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे तरुणीने ८ एप्रिल रोजी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.