Latur : सात जणांच्या टोळीला ‘मोक्का’! लातूर पोलिसांची मोठी कारवाई

लातूर :- सराईत गुन्हेगारांवर यापूर्वी हद्दपार, स्थान बद्धता, झोपडपट्टी दादा कायद्याप्रमाणे कारवाई करूनही त्यांच्यात कसल्याही प्रकारची सुधारणा झाली नाहीं. या आरोपींनी परत किरकोळ कारणावरून भरस्त्यात मारहाण (Beating) करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने अखेर सात जणांवर लातूर पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली. आरोपींमध्ये विधीसंघर्षग्रस्त एका बालकाचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसापूर्वी अंबाजोगाई रोड परिसरात गुन्हेगाराच्या एका टोळीने किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती होती. त्यावरून सदरच्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन टोळीतील सदस्यांना तात्काळ जेरबंद करण्यात आले होते.
टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन टोळीतील सदस्यांना तात्काळ जेरबंद करण्यात आले
या टोळीतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी हद्दपार, स्थान बद्धता, झोपडपट्टी दादा कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली होती. तरीपण नमूद आरोपीमध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्यांनी परत किरकोळ कारणावरून भरस्त्यात मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
सदर गुन्हयातील आरोपी अजिंक्य निळकंठ मुळे, (वय 28 वर्ष रा. जुना औसा रोड, लक्ष्मी कॉलनी, लातूर), बालाजी राजेंद्र जगताप, (वय 27 वर्षे रा. गायत्री नगर जुना औसा रोड लातूर), अक्षय माधवराव कांबळे, (वय 28 वर्षे रा. दत्तकृपा सोसायटी जुना औसा रोड लातूर), (एक विधीसंघर्षगस्त बालक), नितीन शिवदास भालके, (वय 28 वर्षे रा.आदर्श कॉलनी, लातुर), साहिल रशीद पठाण, (वय 24 वर्षे रा. ड्राईव्हर कॉलनी, लातुर) आणि प्रणव प्रकाश संदीकर, (वय 27 वर्षे, रा.लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर) यांनी मागील 10 वर्षाच्या कालखंडात स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी हिंसाचाराचा वापर केला. तलावार, कु-हाड, लोखंडी टामी, दोरी, गावठी पिस्टल इत्यादी घातक शस्त्राचा वापर, जबर दुखापत करून गंभीर दुखापत सह, घातक हत्याराचा (killer) वापर करुन दहशत निर्माण करणे, घातक हात्यारानीशी दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे अशा स्वरूपाचे गंभीर दखलपात्र गुन्हे संघटीत पणे केले आहेत.
किरकोळ कारणावरून भरस्त्यात मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
त्यांच्याविरूध्द पोलीस ठाणे गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी, विवेकानंद चौक, व लातूर ग्रामीण इत्यादी ठिकाणी गंभीर स्वरूपाचे 3 वर्षे व त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असलेले 13 गुन्हे दाखल असून त्याची न्यायालयाने दखल घेतली आहे. सदर टोळी विरोधात पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिवाजीनगर यानी पो.स्टे. शिवाजीनगर गुरनं. 87/2025 कलम 109 (1), 308 (5), 311 भारतीय न्याय संहिता सहकलम 4,25 भारतीय शस्त्र अधिनियम 1949 या गुन्हयातील आरोपी 01 ते 07 यांचे विरूध्द सादर केलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा चे कलम 3(1) (ii), 3(2), 3(4) प्रमाणे कलम वाढ करणेसाठी पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्फतीने पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांना अहवाल सादर केला. त्यास 9 एप्रिल रोजी पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड पोलीस स्टेशन, शिवाजीनगर, लातूर गुरनं. 87/2025 कलम 109 (1), 308 (5), 311 भारतीय न्याय संहिता सहकलम 4,25 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 गुन्हयातील आरोपींच्या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (मोक्का) चे कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) हे वाढीव कलम समाविष्ट करण्याची मंजूरी देण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.