अंजनगाव सुर्जी येथे सत्यशोधक महात्मा फुले यांची जयंती साजरी

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
सत्यशोधक, क्रांतीसुर्य, समाज सुधाकर,स्त्री शिक्षणाचे जनक, शिवशाहीर,महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शुक्रवार रोजी सकाळी १०:३० वाजता बुधवारा, सुर्जी येथील महात्मा फुले पुतळ्याला मालाअर्पण करून व सत्यशोधक महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून यथोचित भाषण देऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ओबीसी बहुजन आघाडी अंजनगाव सुर्जी व समविचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी ओबीसी बहुजन आघाडी, महात्मा ज्योतिबा फुले समता परिषद व समविचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन प्रतिमेला पूजन व हारार्पण करुन महात्मा फुले यांना अभिवादन केले. याप्रसंगी ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पेटकर, संजय वाघुळे,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदिप देशमुख, भाजप पक्षाचे डॉ. विलासराव कविटकर,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विपुल नाथे, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य राजू बोबडे,तसेच शिवदास यावले, ओबीसी बहुजन आघाडीचे चंद्रशेखर देशमुख, सुनील उमक, अविनाश मेहरे, देवानंद महल्ले,क्रांती ज्योती संघटनेचे गजानन कविटकर, कैलास शिरसाट,देवानंद टांक, मनिष मेन, प्रविण पटुकले, शशिकांत नवले, पप्पु गौर, गजानन अडगोकर, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव मनोज मेळे, विजय रायबोले,भाऊराव वानखडे,योगेश चिमटे, शुभम बाळापुरे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी क्रांतीज्योती महात्मा फुले यांचा जयघोष करून अभिवादन केले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.