जिल्हा कचेरीसमोर काँग्रेसची निदर्शने
राहुल गांधी, सोनिया गांधीवरील कारवाईचा निषेध

अमरावती : केंद्र शासनाने अलीकडे चालविलेल्या द्वेषपूर्ण व सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा निषेध करण्याकरिता शुक्रवार १८ एप्रिल रोजी शहर व जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. सदर आंदोलन जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख खासदार बळवंत वानखडे व शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकारने द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त केली. तसेच काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इतर ज्येष्ठ नेतेमंडळी विरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा लोकशाही परंपरेला घातक आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या विरुद्ध शहर व जिल्हा काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर शुक्रवारी दुपारी १२ वाजता निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे, शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदीसह हरिभाऊ मोहोड, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, बिद्व मंगरोळे, परीक्षित जगताप, मुकद्दर खा. पठाण, नामदेव तनपुरे, किशोर देशमुख, संजय लायदे, विनोद पवार, राहुल येवले, प्रदीप देशमुख, ईश्वर बुंदिले, अमोल चिमोटे, भय्यासाहेब अन्यथा तीव्र आंदोलन केंद्र शासनाने अलीकडे हुकूमशाही चालवलेली आहे, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांच्यावर कारवाईदेखील केली जात आहे. त्यामुळे या अन्यायकारक कारवाई विरोधात कॉग्रेसने निषेध केला आहे. यानंतरही केंद्र शासनाने हा प्रकार न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला आहे.
मेटकर, सहदेव बेलकर, महेंद्रसिंग गैलवार, राजाभाऊ हाडोळे, सच्चिदानंद बेलसरे, विलास बोरेकर, मिर्झा जहीर बेग, हरीश मोरे, अमोल बोरेकार, कैलास आवारे, सिद्धार्थ बोबडे, पंकज मोरे, मोहन सिंघवी आदींचा सहभाग होता.