ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

Bhandara : अमरावती मार्गावर कोंढाळी जवळ वॅगनआर उलटली; दामपत्याचा अपघातात मृत्यू

भंडारा :- लाखनी येथील भरत सूरज भोयर हे त्यांच्या धाकट्या मुलीला आरोग्य सेवांमध्ये डॉक्टरची पदवीदान समारंभात सहभागी होऊन परत लाखनीकडे येत असतांना राष्ट्रीय महामार्गावर कोंढाळी जवळ भरधाव वॅगनआर उलटली. त्यात भरत भोयर व पत्नी लक्ष्मी भोयर यांचा रुग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाला. तर मुलगा शैलेष व मुलगी सुश्मिता जखमी झाले. जखमींवर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे लाखनीत शोककळा पसरली आहे. सदर अपघात दि.२० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजतादरम्यान घडला. विशेष म्हणजे जखमी मुलगा शैलेष भोयर याचा दि.२७ एप्रिल रोजी लग्न होणार आहे. हे विशेष.

अमरावती मार्गावर कोंढाळी जवळ वॅगनआर उलटली

लाखनी येथील भरत भोयर यांची धाकटी मुलगी ममता भोयर ही मोझरी येथील आरोग्य सेवा प्रशिक्षण महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेत आहे. दि.२० एप्रिल रोजी मोझरी येथे बीएएमएस पदवीदान कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला भरत भोयर हे त्यांच्या कुटुंबासह पत्नी, मुलगा व मुलीसह चौघेही त्यांचे वाहन क्र.एमएच ३१ सीआर ०२०१ या वॅगनआरने मोझरीला धाकटी मुलगी डॉ.ममता हिच्या दिक्षांत समारंभाला उपस्थित राहून ते लाखनीला परतत होते. दुपारी ४ वाजतादरम्यान कोंढाळी जवळ कारचालक मुलगा शैलेषचा गाडीवरील ताबा सुटला. कार अनियंत्रित होऊन कारने दोन-तीन पलट्या घेत महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे आई-वडील आणि भाऊ-बहिण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना कोंढाळी प्रा.आ.केंद्रात नेण्यात आले.

जखमींना नागपूरला हलविण्यात आले

प्राथमिक उपचारानंतर जखमींना नागपूरला हलविण्यात आले. त्या ठिकाणी भरत भोयर व पत्नी लक्ष्मी भोयर यांना तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. तर जखमी मुलगा शैलेष व मुलगी सुश्मिता यांचेवर वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचार सुरु आहे. या घटनेमुळे लाखनीत शोककळा पसरली असून पती-पत्नीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.जखमी शैलेष याचे दि.२७ एप्रिल रोजी लग्न बहिणीच्या दिक्षांत समारंभ आटोपून गावाकडे परत येत असतांना कोंढाळी गावाजवळ झालेल्या अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाला. तर बहिण सुश्मिता व शैलेष भोयर जखमी झाले. बहिण सुश्मिता ही एका खाजगी बँकेत नोकरी करीत असल्याचरी माहिती पुढे येत आहे. तर जखमी शैलेष याचे दि.२७ एप्रिल रोजी लग्न होणार होते. मात्र शुभ कार्याच्या काही दिवसाअगोदर भोयर कुटुुंबियावर काळाचा घाला पडून आई-वडिलांचा दुर्दैवी रस्ता अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे लग्न कार्यावर विर्जन पडले असून लग्नाच्या केवळ एक आठवडा आधी शैलेष याच्या आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूने दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.