ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
मेळघाटात घाट वळणाच्या रस्त्यावर २४ तासात दोन अपघात आरटीओच्या गाडीला अपघात

धारणी- परतवाडा मार्गावर सेमाडोहच्या घाटात अमरावती वरून धारणीकडे जाणाऱ्या आरटीओच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
धारणी ते परतवाडा घाटवळणाच्या मार्गाने अपघातांची श्रृंखला निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात दोन अपघात झाले असून सुदैवाने त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. अमरावती वरून धारणीला जात असलेल्या आरटीओ च्या गाडीला सेमाडोह ते घटांग च्या मधात घाटवळणावर समोरून अचानक वाहन आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला तोल गेल्याने RTO अचानकपणे त्यांचे वाहन रस्त्याच्या खाली उतरुन खाईत जाताना थोडक्यात बचावले. कोणत्याही झाडाला धडक न लागता. गाडीला किरकोळ मार लागले आहे.