अचलपूर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत
रासेगाव, कांडली, सावळीदातुरा, धामणगाव गढी, मल्हारा - महिलांसाठी आरक्षित

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणाची प्रक्रिया तहसील कार्यालयात उपविभागीय राजस्व अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार डॉ. संजय गरकल, नायब तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सोडत काढत अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग, सर्वसाधारण व महिला आरक्षण निश्चित करण्यात आले.
अचलपूर तालुक्यातील रासेगाव, कांडली, सावळीदातुरा, धामणगाव गढी, मल्हारा यासह अन्य ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. अनुसूचित जाती रामापूर बु., एकलासपूर, येलकी, देवगाव, पांढरी, निमदरी, म्हसोना. अनुसूचित जाती महिला- मल्हारा, कोठारा, खरपी, हिवरापूर्णा, वासनी खुर्द, वइझर, देवमाळी अशा प्रकारे १४ ग्रामपंचायतीचे सरपंच। सरपंच पद अनुसूचित जातीकरिता आरक्षित करत ७ पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले.
अनुसूचित जमाती खांजमानगर, पथ्रोट, नारायणपूर, शिंदी बु., बोपापूर, अनुसूचित जमाती महिला – घोडगाव, कुष्ठा बु., रासेगाव, वासनी बु., वडगाव फत्तेपूर अशा अनुसूचित जमातीच्या १० ग्रामपंचातीचे सरपंच पद आरक्षित करत ५ ग्रामपंचायतीकरिता महिलांसाठी सरपंच पद आरक्षित करण्यात आले. नागरिकांचा मागासप्रवर्ग-कुष्ठा खुर्द, टवलार, दोनोडा, बोर्डी, सावळापूर, धोतरखेडा,नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला हनवतखेडा, चमक बु, खैरी, तुळजापूर जहागीर, सावळीदातुरा, चमक खुर्द. नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता १२ ग्रामपंचायती आरक्षित करत ६ ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. सर्वसाधारण उपातखेडा, काकडा, वाघडोह, निंभारी, निजामपूर, कोल्हा, बोरगाव पेठ, बळेगाव, भिलोना, वडनेर भुजंग, पिंपळखुटा, येसुर्णा, असदपूर, रामापूर बेलज, बोरगाव दोरी, बेलखेडा, चौसाळा, दर्याबाद. सर्वसाधारण महिला परसापूर, सालेपूर, गौरखेडा, भूगांव, निमकुंड, जवळापूर, धामणगाव गढी, कांडली, शहापूर, कविठा बु, कासमपूर, इसापूर, जवर्डी, येवता, सावळी बु., नायगाव, हरम, अंबाडा कंडारी अशाप्रकारे ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण करत १८ ग्रामपंचायतीवर आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षणाची सोडत देवरी येथील निवासी देवा अभिनव आगे या चिमुकल्याच्या हस्ते काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड थेट जनतेतून असल्याने सरपंच पदाच्या आरक्षणामुळे अनेकांचे राजकीय गणित बिघडले, तर काहींना संधी प्राप्त होणार आहे.