पोसरी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन – विचार, श्रद्धा आणि विकासाचं प्रतीक! आमदार श्री महेंद्र थोरवे
पोसरी गावात बौद्ध वाडीसाठी प्रवेशद्वाराचे लोकार्पण व आंबेडकर भवनाचे भूमिपूजन संपन्न - आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विकासकामांना गती

संतोष मोरे :खालापूर कर्जत तालुक्यातील पोसरी गावात दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमांतर्गत पोसरी गावातील बौद्ध वाड्याकडे जाणाऱ्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले. या भवनासाठी सुरुवातीला 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, भविष्यात सुशोभीकरण व इतर कामांसाठी आणखी 25 लाखांचा निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वधर्मीय व समाजातील गोरगरीब, शोषित-वंचित घटकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दिलेले संविधानामुळे भारत आज महासत्तेकडे वाटचाल करत आहे. प्रत्येक गावात बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी, हीच खरी आदरांजली ठरेल.”
या कार्यक्रमात श्री मनोहर थोरवे (उपसभापती, पंचायत समिती कर्जत), श्री विश्वनाथ (पप्पू) थोरवे (उद्योजक), श्री एकनाथ भगत (सरपंच), श्री हर्षद विचारे (माजी सरपंच), श्री निलेश थोरवे (सदस्य), श्री धनंजय देशमुख (ग्रामसेवक) यांची उपस्थिती लाभली.
तसेच पंचशील तरुण मित्र मंडळाचे श्री कुंडलिक रोकडे (अध्यक्ष), श्री अनिल रोकडे, श्री मनोहर रोकडे, श्री किसन रोकडे, श्री अविनाश रोकडे, श्री राजेश रोकडे, श्री परशुराम जाधव, श्री योगेश रोकडे यांचाही विशेष सहभाग लाभला.
या कार्यक्रमामुळे पोसरी गावातील बौद्ध समाजाला नवसंजीवनी मिळाली असून, भविष्यात येथे भव्य व सुसज्ज आंबेडकर भवन उभे राहणार आहे. गावकरी आणि समाजबांधवांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून आमदार श्री महेंद्र थोरवे यांचे आभार मानले.